चांद मातला मातला ..
चित्रपट - उंबरठा (१९८२)
गीत - वसंत बापट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर
====================
शब्द हे कुठल्याही गाण्याचा आत्मा आहे, त्यामुळेच एखाद्या गाण्याला दिलेल्या चांगल्या संगिताबरोबरच त्या गाण्यांचे शब्द ही खूप महत्वाचे ठरतात. अश्याच रसिकांसाठी सुपरहिट मराठी गाण्यांचे बोल येथे अनुभवयास मिळतील ...
चांद मातला मातला ..
चित्रपट - उंबरठा (१९८२)
गीत - वसंत बापट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर
====================
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ..
चित्रपट - उंबरठा (१९८२)
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर
====================
फिटे अंधाराचे जाळे ..
चित्रपट - लक्ष्मीची पाऊले (१९८२)
गीत - सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
गायक - आशा भोसले, सुधीर फडके
====================
राजा ललकारी अशी घे ..
चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - अनिल-अरुण
गायक- सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल
====================
हो हो हो .. हो हो हो .. हो हो हो
ऐरणीच्या देवा तुला ..
चित्रपट - साधी माणसं (१९६५)
गीत - जगदीश खेबुडकर
गायिका - लता मंगेशकर
संगीत - आनंदघन
====================
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
लेऊ लेनं गरिबीचं चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरिबीचं चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं
धनी मातूर माझा देवा वाघा वानी आसू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली
इडा पिडा जाईल
किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग
किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
सुख थोडं दु:ख भारी, दुनिया ही भली बुरी
सुख थोडं दु:ख भारी, दुनिया ही भली बुरी
घाव बसल घावावरी, सोसायला झुंजायला अंगी बळ
येऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
====================
Video :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काळ्या मातीत मातीत ..
गीत - विठ्ठल वाघ
संगीत - अनिल-अरुण
गायक - अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर
--------------------
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
वीज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती, न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जीवाला पडते
भूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते
राघू तिफण हाणतो मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या आहा
झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते सारखी
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जणू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते, कपाशी फुलते
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
चालं उनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो, काटा पायात रुततो
काटा पायात रुततो हो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडते
लाल रगात सांडता, हिरवं सपान फुलतं
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
वीज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो
काळ्या मातीत मातीत तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
तिफण चालते तिफण चालते
===============
Video :
~~~~~~~~~~~~~~~
गीतकार - शांताराम नांदगावकर
संगीत - अरुण पौडवाल
गायक - सचिन, सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार
.
----------
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
साडी कशी नेसू नी गालावर हसू
ज्याला जसे हवे ते तसे तसे दिसू
भीती वाटते मला कि कुठे तरी फसू
जो डरे तो मरे ही दुनियेची रीत अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
ओ असल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
ह्याची टोपी त्याला नि त्याची टोपी ह्याला
कळे ना हे ज्याला तो पुरता बुडाला
लोकं भुलताती या वरल्या रंगाला
जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी..
तू नवरी कशी गं जबरी
राजी ख़ुशीनं गोडीनं
माझ जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोड तरी भान भान
तू नवरी कशी गं जबरी
राजी ख़ुशीनं गोडीनं
माझ जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोड तरी भान भान
नको रे रागानं बोलू मनमोहना
राधा प्रीतीची मी बावरी होय बावरी
चल रे आनंदी संसार मांडूया नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी नवरी लाडाची मी
लाजरी हाय लाजरी
हे.. नाचू खेळू गाऊ नी मजे मध्ये राहू
उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे चाखू
जिथे जिथे जाऊ तिथे चलाखी ही दावू
सुखासाठी जगामध्ये इथे तिथे चाले अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
साडी कशी नेसू नी गालावर हसू,
ज्याला जसे हवे ते तसे तसे दिसू
भीती वाटते मला कि कुठे तरी फसू
जो डरे तो मरे ही दुनियेची रीत अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी ..
==========
Video :
~~~~~~~~~~
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ..
झी मराठी (२०२१)
गीत - अभिषेक खणकर
संगीत - समीर साप्तीस्कर
गायिका - मुग्धा कऱ्हाडे
--------------------
ओठात कबुली
मनात मोहोर अबोली
मिठित दिलासा हि हवा
पुरेसा भरोसा
गर्दीत थोडासा अडोसा
सुखाचा उसासा हि हवा
धागा नात्यातला
अवघ्या गोत्यातला
गुंफुन गोफ हा विणायला हवा
साध्या सोप्यातला
भरल्या खोप्यातला
आनंद आपला म्हणायला हवा
प्रेमामध्ये गुंतलेले पुरे दोन जीवं..
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
आणि काय हव..
==========
Video :
~~~~~~~~~~