Showing posts with label marathi song lyrics. Show all posts
Showing posts with label marathi song lyrics. Show all posts

Wednesday, September 29, 2021

Chand Matla Matla Umbartha movie song

 चांद मातला मातला .. 


चित्रपट - उंबरठा (१९८२)

गीत - वसंत बापट

संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

गायिका - लता मंगेशकर


====================

चांद मातला
चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू

अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

आला समुद्र ही रंगा, रंगा-रंगा-रंगा-रंगा
त्याचा धिटाईचा दंगा, दंगा-दंगा-दंगा-दंगा
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू
चांद मातला, मातला

===================
Video :




Tuesday, April 23, 2019

Jeevlaga Serial Title Song


जिवलगा शीर्षक गीत


गीत - श्रीपाद अरुण जोशी

संगित - निलेश मोहरीर

गायक - वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषीकेश रानडे



====================

 जग सारे इथे
थांबले वाटते
भोवताली तरी चांदणे दाटते

मर्मबंधातल्या 
ह्या सरी बरसता
उन वाटेतले
सावली भासते

ओघळे थेंब गाली
सुखाचा
 मिटे अंतर लपेटून घेता...

तू माझा 
मीच तुझी
सख्या


जिवलगा

जिवलगा


ऐल ही
तूच अन
पैल ही
तू सख्या



जिवलगा

जिवलगा

जिवलगा


====================

Video :






~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Wednesday, April 17, 2019

Aamdar Zalya Sarkha Watatay marathi album song

 
आमदार झाल्यासारखं वाटतंय..

अल्बम - सुमित म्युजिक
 
संगीत - साजन-विशाल
 
गीत - साजन बेंद्रे
 
गायक - संकल्प गोळे

====================


मला भरलं तुझ वारं गं
मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी 
माझ काळीज तुटतंय 

तुझ्या एका मतासाठी 
माझ काळीज तुटतंय

जवा बघतीस तू माझ्याकड
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
 हे जवा बघतीस तू माझ्याकड
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
 जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय

तू आवाज देता, मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
 हे तू आवाज देता, मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
मी दमलो मागं लागून
रात रात काढली जागून
तू दिसली नाय 
कि मनात या 
भीतीचं वारं सुटतंय

जवा बघतीस तू माझ्या कडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू माझ्या कडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय

तुझ्या मागं मागं
किती घोळत्यात गोंड गं
पण माझ्या काळजात रवला 
आय लव्ह यू चा झेंडा गं

हे तुझ्या मागं मागं
किती घोळत्यात गोंड गं
पण माझ्या काळजात रवला 
आय लव्ह यू चा झेंडा गं

हि तुझ्यासाठी धडपड
प्रेमाचं मिशन फडफड
किती आवरू मनाला
मन दचकून उठतय

जवा बघतीस तू माझ्या कडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
हे जवा बघतीस तू माझ्या कडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू ह्याच्या कडं
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय


====================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~





Tuesday, April 9, 2019

Lagir Zaal Jee Serial Title Song


लागिरंं झालं जी..

झी मराठी (२०१७)

संगित - ए व्ही प्रफ्फुल्लचंद्र

गायकप्रविण कुंवर, रुपाली मोघे



----------

लागला लळा
उरी जलजला
तूच जीव प्राण मला
हर ऐक श्वासाला
पाहीन मी तुला
जीवाची आन मला..

तुझ्या ठाई सराभार जीनंं 
सारं ध्यान पावलं...

सारं सुखात देईल आंदण 
सारं दान पावलं

तू वाट-वाट मी पायघडी
तू वात-वात मी ज्योत तुझी..

भाळला टिळा ह्यो पिरतीचा
कोSSSSरला जिव्हारी चेहरा तुझा

उठ्गीर सारी त्या मारिला
बांधुनी ही सैर निघाली

दुमदुमावी आसमंती
ह्या पली ही जिन्दगानी

प्रेमवेड्या काळजाची...



प्राणज्योत पेटली ....
ओ ओ ओ ओ ओ 
लागिर.... लगिरंं झालं जी
ओ ओ ओ ओ ओ


लागिर.... लागिरंं झालं जी

लागिरंं झालं .... जी

==========

Video :



~~~~~~~~~~


Tujhyat Jeev Rangla Serial Title Song


तुझ्यात जीव रंगला..

झी मराठी (२०१७)


गीत - श्रीरंग गोडबोले

संगीत- प्रफ्फुल्लचंद्र

गायिका - आनंदी जोशी




----------

भूईलाया मेंघुटांचं दान
चहूकडं बहरलं रान
पाटामधी झुळूझुळू पाणी
पाखराच्या चोचींंतली गाणी
शेतामधे राबणार लेक काळ्या मातीचा
रांगडा तो मर्द माझा
आभाळाच्या छातीचा
वेडापिसा छंद असा लागला..

तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला

रंगला.....
तुझा जीव झाला येडापिसा
गुंगला.....
ह्यो हरपून देहभान
झिंगला.....
ह्यो पिरतीचा रंगामंंधी 
दंगला....


==========





~~~~~~~~~~

Saturday, April 6, 2019

Jeev Zala Yeda Pisa Serial Title Song


जीव झाला येडापिसा..

कलर्स मराठी (२०१९) 

गीतकार - दासू

संगीत - मंगेश धाकडे 

गायक - सुहास सावंत



====================


रात दिन ध्यास तुझा
माझी मला भूल गं

चिखलात उगवलं पीरतिचं फुल गं


बोलणाऱ्या आभाळीचा
चांदण्या फोडलेला

पिरतीचा डंख गोड रगतात भिनलेला..

वाटवरी काटंकूटं
हात तुझा हातामंदी

नगं नगं म्हणताना झाली कशी नजरबंदी..

हे पाण्याविना ......हा
पाण्याविना तडफडं
वाळू मंदी जैसा मासा

तुझ्यासाठी तुझ्यासंग जीव झाला येडापिसा

तुझ्यासाठी तुझ्यासंग जीव झाला येडापिसा



हो... जीव झाला येडापिसा


====================

Video:




~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, January 7, 2017

100 Days Serial Title Song


१०० डेज...

झी मराठी (२०१६)                                                     

गीत - वलय मुलगुंड

संगीत - पंकज पडघम

गायिका - हर्षदीप कौर, सायली पंकज



====================


जोबन मधूबन बेचैन करिया
तुम्हरे दरस की प्यासी नजरिया

आजा .... सजनवा ....
हमरी अटरिया

बितेना तुमबिन बैरन रतिया

जोबन मधूबन बेचैन करिया 
तुम्हरे दरस की प्यासी नजरिया


====================
Video : 



~~~~~~~~~~~~~~~~~~~



Tuesday, January 3, 2017

Ratris Khel Chale


रात्रीस खेळ चाले...

झी मराठी (२०१७)


संगीत    - पंकज पडघन


गायिका  - सायली पंकज




====================


पाचोळा सैरावैरा, वारा पिसाट वाहे

भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे

सावल्या मुक्याने हलती, भवताली विणती माया

डोहाच्या खोल तळाशी, अतृप्त पसरली छाया

नि:शब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले

आकार गूढ धुक्याला, आले विरून गेले

रात्रीस खेळ चाले ... रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले ... रात्रीस खेळ चाले

====================
Video :



#marathi #serial #zeemarathi #RatrisKhelChale #lyrics #sayalipankaj

~~~~~~~~~~~~~~~~~~~~