गीतकार - शांताराम नांदगावकर
संगीत - अरुण पौडवाल
गायक - सचिन, सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार
.
----------
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
साडी कशी नेसू नी गालावर हसू
ज्याला जसे हवे ते तसे तसे दिसू
भीती वाटते मला कि कुठे तरी फसू
जो डरे तो मरे ही दुनियेची रीत अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
ओ असल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिक चा राजा
ह्याची टोपी त्याला नि त्याची टोपी ह्याला
कळे ना हे ज्याला तो पुरता बुडाला
लोकं भुलताती या वरल्या रंगाला
जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी..
तू नवरी कशी गं जबरी
राजी ख़ुशीनं गोडीनं
माझ जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोड तरी भान भान
तू नवरी कशी गं जबरी
राजी ख़ुशीनं गोडीनं
माझ जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोड तरी भान भान
नको रे रागानं बोलू मनमोहना
राधा प्रीतीची मी बावरी होय बावरी
चल रे आनंदी संसार मांडूया नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी नवरी लाडाची मी
लाजरी हाय लाजरी
हे.. नाचू खेळू गाऊ नी मजे मध्ये राहू
उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे चाखू
जिथे जिथे जाऊ तिथे चलाखी ही दावू
सुखासाठी जगामध्ये इथे तिथे चाले अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
साडी कशी नेसू नी गालावर हसू,
ज्याला जसे हवे ते तसे तसे दिसू
भीती वाटते मला कि कुठे तरी फसू
जो डरे तो मरे ही दुनियेची रीत अशी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी ..
==========
Video :
~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment