Wednesday, September 29, 2021

Chand Matla Matla Umbartha movie song

 चांद मातला मातला .. 


चित्रपट - उंबरठा (१९८२)

गीत - वसंत बापट

संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

गायिका - लता मंगेशकर


====================

चांद मातला
चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू

अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

आला समुद्र ही रंगा, रंगा-रंगा-रंगा-रंगा
त्याचा धिटाईचा दंगा, दंगा-दंगा-दंगा-दंगा
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू
चांद मातला, मातला

===================
Video :




No comments:

Post a Comment