Showing posts with label airanichya deva tula song. Show all posts
Showing posts with label airanichya deva tula song. Show all posts

Wednesday, September 29, 2021

Airanichya Deva Tula

 ऐरणीच्या देवा तुला .. 


चित्रपट - साधी माणसं (१९६५)

गीत - जगदीश खेबुडकर

गायिका - लता मंगेशकर

संगीत - आनंदघन



====================

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे


लेऊ लेनं गरिबीचं चनं खाऊ लोखंडाचं

लेऊ लेनं गरिबीचं चनं खाऊ लोखंडाचं

जिनं व्हावं आबरुचं

धनी मातूर माझा देवा वाघा वानी आसू दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे


लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली

इडा पिडा जाईल 

किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग 

किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे


सुख थोडं दु:ख भारी, दुनिया ही भली बुरी

सुख थोडं दु:ख भारी, दुनिया ही भली बुरी

घाव बसल घावावरी, सोसायला झुंजायला अंगी बळ

येऊ दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे


ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

====================

Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~