Monday, April 18, 2016

Pahile Na Mee Tula ....

पाहिले न मी तूला ....

चित्रपट  : गुपचूप गुपचूप (१९८३)

गीतकार : मधूसुधन कालेलकर

संगीत   : अनिल-अरुण

गायक   : सुरेश वाडकर
====================

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला ...

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला ....

का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला ...

मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
हो मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तूला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला ...

====================

Video :




#SureshWadkar #KuldeepPawar #Ranjna #GupchupGupchup 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment