Friday, April 15, 2016

Tu Hee Re Maza Mitwa

तू ही रे माझा मितवा ....

चित्रपट  : मितवा (२०१५)
गीतकार : मंदार चोळकर
संगीत   : शंकर-एहसान-लॉय
गायक   : शंकर महादेवन, जानव्ही प्रभू

====================

वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे..

वेड्या मना सांग ना व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
हो ....... सुटतील केंव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा.... तू हि रे माझा मितवा

झुला भावनांचा उंच उंच न्यावा, स्वत:शी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे, भिजल्यावरी प्यास का उरे मागे
फितूर मन बावरे, आतुर क्षण सावरे
हो ..... स्वप्नाप्रमाणे पण खरे,
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू हि रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा ..... तू हि रे माझा मितवा

वेड पांघरावे न व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी ही, पास पास दोघात अंतर तरी ही
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे,
हो ..... उन-सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा

तू हि रे माझा मितवा ..... तू हि रे माझा मितवा

====================
Video :

#SwapnilJoshi #SonaleeKulkarni #Mitwa

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment