Showing posts with label Love. Show all posts
Showing posts with label Love. Show all posts

Monday, April 18, 2016

Pahile Na Mee Tula ....

पाहिले न मी तूला ....

चित्रपट  : गुपचूप गुपचूप (१९८३)

गीतकार : मधूसुधन कालेलकर

संगीत   : अनिल-अरुण

गायक   : सुरेश वाडकर
====================

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला ...

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला ....

का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला ...

मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
हो मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तूला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
ना काळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तूला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तूला ...

====================

Video :




#SureshWadkar #KuldeepPawar #Ranjna #GupchupGupchup 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Sunday, June 28, 2015

Haa Saagari Kinaraa ...

हा सागरी किनारा ....


चित्रपट     : मुंबईचा फौजदार (१९८५)

गीतकार    : जगदीश खेबुडकर

संगीतकार : विश्वनाथ मोरे

गायक       : सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल

====================


हा सागरी किनारा,
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा 
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा,
अंगवारी शहारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा..



मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी, का न्यारीच आज गोडी
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी, का न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी
ओ ओ ओ 
का भूल ही पडावी
वळखून घे इशारा 
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगवारी शहारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा

होते अजाणता मी ते छेडले तराणे 
होते अजाणता मी ते छेडले तराणे
स्वीकारल्या सुरांचे, आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई... हा रोम रोम गाई 
गातो निसर्ग सारा,ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा

ओ ओ ओ 

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा


====================

Video :





#SureshWadkar #AnuradhaPaudwal #MumbaichaFauzdar 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Drushta Lagnya Joge Saare ....

दृष्ट लागण्याजोगे सारे ....

चित्रपट  : माझं घर माझा संसार (१९८६)

गीतकार : सुधीर मोघे 

संगित    : अरुण पौडवाल 

गायक    : सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल 


====================
हम्म हम्म हम्म्म
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

हम्म्म हम्म्म हम्म्म
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे




स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे

दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे

स्वप्नाहून सुंदर घरटे,
ला ला ला ला

मनाहून असेल मोठे

ला ला ला ला
दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे




आनंदाची अन्‌ तृप्तीची,
शांत सावली इथे मिळे

जग दोघांचे असे रचू की,

स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..



जुळलेले नाते अतुट,घड़े जन्म जन्माची भेट
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण

जुळलेले नाते अतुट,
ला ला ला

घड़े जन्मजन्माची भेट
ला ला ला ला
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण

सहवासाचा सुगंध येथे
आणि सुगंधा रूप दिसे

जग दोघांचे असे रचू की

स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे


दृष्ट लागण्याजोगे सारे,
गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे …


====================



Video :






#SureshWadkar #AnuradhaPaudwal #AjinkyaDev


~~~~~~~~~~~~~~~~~~~~