अष्टविनायका तुझा महिमा कसा..
चित्रपट - अष्टविनायक (१९७९)
गीतकार - जगदीश खेबुडकर
संगीत - अनिल-अरुण
गायक - अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश
====================
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती, पहिला गणपती..अहा
(गणपती, पहिला गणपती) अहा
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
(अकरा पायरी हो, हो अकरा पायरी हो)
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
(शोभा साजरी हो, शोभा साजरी हो)
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
अरे मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती, दुसरा गणपती आहा
(गणपती, दुसरा गणपती)
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
(थेऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लई लई जुनी)
काय सांगू आता काय सांगू
डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी
ओ साऱ्यांनी
ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी
ओ पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी
ओ वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी
भगताच्या मनी..
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती तिसरा गणपती
(गणपती तिसरा गणपती)
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
रं रं रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
रं रं रं
(सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं.. पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं)
हे दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगरं
ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं, नवाल झालं
टेकावरी देऊळ आलं
(राकूस मेलं नवाल झालं, टेकावरी देऊळ आलं)
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
मंडपात आरतीला खुशाल बसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती गणपती गं चौथा गणपती
(गणपती गणपती गं चौथा गणपती)
बाई रांजणगावचा देव महागणपती
(बाई रांजणगावचा देव महागणपती)
दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती
(दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती)
गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन
(गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन)
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण
(सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण)
किती गुणगान गावं किती करावी गणती
(बाई रांजणगावचा देव महागणपती)
पुण्याईचं दान घ्यावं
हे पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती पाचवा, पाचवा गणपती
(गणपती पाचवा, पाचवा गणपती)
ओझरचा इघ्नेश्वर
बाई ओझरचा इघ्नेश्वर
लांब रुंद हाय मूर्ती
जडजवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
(ओझरचा इघ्नेश्वर)
डोळ्यामंदी माणकं हो.. डोळ्यामंदी माणकं हो
हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरती हो
सारा बघून सोहळा
चारीबाजू तटबंदी
मधी गणाचं मंदिर
(ओझरचा इघ्नेश्वर)
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय भक्तिभाव
रमती इथं रंकासंगती राव हे जी जी
(रमती इथं रंकासंगती राव हे जी जी )
(रमती इथं रंकासंगती राव हे जी जी )
खडकांत केलं खोदकाम
खडकांत केलं खोदकाम
दगडांत मंडपी खांब
दगडांत मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं
दगडांत भव्य मुखवटं
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
(ध्यास पार्वतीचा..ध्यास पार्वतीचा)
अन् गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
जी जी रं ... जी जी रं
दगड माती रूप देवाचं
अरं दगड माती रूप देवाचं ,लेण्याद्री जसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
सातवा गणपती राया
सातवा गणपती राया
सातवा गणपती राया
हे हे हे हे हा
महड गावाची महसूर
वरद विनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद, जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची, कळसाच्या वरं
(कळसाच्या वरं)
सपनात भक्ताला कळं
देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं
त्यानं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती
हो हो हो हो हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
जी जी रं जी जी
(माझ्या गणा रं जी जी जी..माझ्या गणा रं जी जी जी..माझ्या गणा रं जी जी जी)
हे हे हे हे हं...
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
(आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा )
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदिदेव तू बुद्धिसागरा
(पाली गावच्या बल्लाळेश्वरा,आदिदेव तू बुद्धिसागरा)
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख
सूर्यनारायण करी कौतुक
(स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख, सूर्यनारायण करी कौतुक)
डाव्या सोंडेचे रूप साजिरे
कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे
(डाव्या सोंडेचे रूप साजिरे, कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे)
चिरेबंद या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भीती
(चिरेबंद या भक्कम भिंती, देवाच्या भक्तीला कशाची भीती)
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
===================
Video :
VIDEO
~~~~~~~~~~~~~~~~~~~~