Showing posts with label guru thakur. Show all posts
Showing posts with label guru thakur. Show all posts

Sunday, October 24, 2021

Devak Kalji Re..

 देवाक काळजी रे..


चित्रपट - रेडू (२०१७)

गीतकार - गुरु ठाकूर

संगीत - विजय नारायण गावंडे

गायक - अजय गोगावले


====================

होणार होतला जाणार जातला,मागे तू फिरू नको

उगाच सांडून खऱ्याची संगत,खोट्याची धरू नको

होणार होतला जाणार जातला,मागे तू फिरू नको

उगाच सांडून खऱ्याची संगत,खोट्याची धरू नको

येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको

तुझ्या हाती आहे डाव सारा,इसर गजाल कालची रे


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे


(सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ

शोधूनि तुझी तू वाट,चाल एकला

होऊ दे जरा उशीर,सोडतोस काय धीर

रात संपता पहाट,होई रे पुन्हा)


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे




फाटक्या झोळीत येऊन पडते, रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला,कशी रं सुटावी आशा

ओ ओ
 
फाटक्या झोळीत येऊन पडते, रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला,कशी रं सुटावी आशा

अवसेची रात नशिबाला,पुनवेची राख पदराला

होईन पुनवं मनाशी जागव,खचून जाऊ नको

येईल मुठीत तुझ्याही आभाळ,माघार घेऊ नको

उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या,पाऊल रोखू नको 

साद घाली दिस उद्याचा नव्याने,इसर गजाल कालची रे



देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे


(सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ

शोधूनि तुझी तू वाट,चाल एकला

होऊ दे जरा उशीर,सोडतोस काय धीर

रात संपता पहाट,होई रे पुन्हा)


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे

====================

Video : 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, April 13, 2016

Khel Mandalaa ....

खेळ मांडला ....
चित्रपट   : नटरंग (२०१०) 

गीतकार : गुरु ठाकूर

संगीत     : अजय-अतुल

गायक     : अजय गोगावाले

====================

तुझ्या पायरीशी कुणी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरण ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळूनी उधळतो जीव मे बापा
मन वायू उरी पेटला
खेळ मांडला
खेळ मांडला
देवा.....
खेळ मांडला


सांडली ग रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू राहा उभा
ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला


हे ....... उसवला गणगोत सारं आधार कुणाचा न्हाई
भेगाळल्या भुईपारी जीन अंगार जीवाला जाळी

बळ दे झुंजायला किरपेची ढाल दे
ईनविती पंचप्राण जीव्हारात ताल दे
करपलं रान देवा
जळल शिव्हार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला .......


====================
Video :



#KhelMandla #Natrang #AjayAtul 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Sunday, June 28, 2015

Man Udhan Varyache ....

मन उधान वा-याचे ....


चित्रपट   : अगं बाई..अरेच्या (२००४)

गायक    : शंकर महादेवन

गीतकार : गुरु ठाकुर 


संगीत    : अजय-अतुल




====================

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.....
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.....
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते (२)


आकाशी स्वप्‍नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते...

मन उधाण वार्‍याचे,
गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

====================
Video :





#AjayAtul #ShankarMahadevan #SanjayNarvekar #ManUdhanVaryache 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~