Thursday, October 7, 2021

Dehachi Tijori..

देहाची तिजोरी .. 


चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा (१९६८)

गीतकार - जगदीश खेबुडकर

संगीत - सुधीर फडके

गायक - सुधीर फडके


====================

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता, उघड दार देवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा



पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची

मनी चोरट्याच्या का रे, भिती चांदण्यांची

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा




उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप

दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा


उघड दार देवा आता, उघड दार देवा




स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी

आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी

घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा



तुझ्या हाती पांडुरंगा, तिजोरी फुटावी

मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी

मार्ग तुझ्या राऊळाचा, मला आकळावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा



भलेपणासाठी कोणी, बुरेपणा केला

बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला

आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा


उघड दार देवा आता, उघड दार देवा


देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता, उघड दार देवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

====================

Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment