Sunday, October 3, 2021

Datun Kanth Yeto

 दाटून कंठ येतो .. 


चित्रपट - अष्टविनायक (१९७९)

गीतकार - शांता शेळके

संगीत - अनिल-अरुण

गायक- पं. वसंतराव देशपांडे

====================

दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्री गणेशा
वळवून अक्षरांना, केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी, जातो सुखावुनि मी
या गोड आठवाने
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


बोलात बोबडीच्या संगीत जागविले
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, एकेक सूर यावा
न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे
व्हावे सुरेलगाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, परक्या परी आता मी
येथे फिरुनी येणे
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
दाटून.. कंठ येतो

===================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment