Saturday, October 2, 2021

Mala Lagli Kunachi Uchki

 मला लागली कुणाची उचकी .. 


चित्रपट - पिंजरा (१९७३)

गीतकार - जगदीश खेबुडकर

संगीत - राम कदम

गायिका - उषा मंगेशकर





====================

हं (आता गं बया)
हं (काय झालं)
(अगं, हो, हो, हो, हो, हो)
(अशी कुठं चालली ही पाजमात गचकं खात.. आं)

आली-आली सुगी म्हणुन चालले बिगी-बिगी
गोष्ट न्हाई सांगन्याजोगी
गोष्ट न्हाई सांगन्याजोगी
कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी
अहो, मला लागली कुणाची उचकी

(कुणाची गं कुणाची .. ह्याची का त्याची)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
मला लागली कुणाची उचकी

तरणीताठी नार शेलाटी, चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरा-गोरा खांदा, पदर वाऱ्यावर
फडामधे चाहुल, वाजलं त्याचं पाउल
माझ्या उरांत भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी
अहो, मला लागली कुणाची उचकी

(कुणाची गं कुणाची .. ह्याची का त्याची)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
मला लागली कुणाची उचकी


निजले डाव्या कुशी हाताची उशी करून मी तशी
वाऱ्याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुशी
सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो, मला लागली कुणाची उचकी

(कुणाची गं कुणाची .. ह्याची का त्याची)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
मला लागली कुणाची उचकी


उठून सकाळी लई येरवाळी गेले पाणवठ्यावरी
उन्हात बसले न्हात, अंगाला पानी गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं त्याच लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो, मला लागली कुणाची उचकी

(कुणाची गं कुणाची) हं
(कुणाची गं कुणाची) हं, (ह्याची का त्याची)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
मला लागली कुणाची, हं

====================
Video:


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment