Sunday, October 24, 2021

Devak Kalji Re..

 देवाक काळजी रे..


चित्रपट - रेडू (२०१७)

गीतकार - गुरु ठाकूर

संगीत - विजय नारायण गावंडे

गायक - अजय गोगावले


====================

होणार होतला जाणार जातला,मागे तू फिरू नको

उगाच सांडून खऱ्याची संगत,खोट्याची धरू नको

होणार होतला जाणार जातला,मागे तू फिरू नको

उगाच सांडून खऱ्याची संगत,खोट्याची धरू नको

येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको

तुझ्या हाती आहे डाव सारा,इसर गजाल कालची रे


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे


(सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ

शोधूनि तुझी तू वाट,चाल एकला

होऊ दे जरा उशीर,सोडतोस काय धीर

रात संपता पहाट,होई रे पुन्हा)


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे




फाटक्या झोळीत येऊन पडते, रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला,कशी रं सुटावी आशा

ओ ओ
 
फाटक्या झोळीत येऊन पडते, रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला,कशी रं सुटावी आशा

अवसेची रात नशिबाला,पुनवेची राख पदराला

होईन पुनवं मनाशी जागव,खचून जाऊ नको

येईल मुठीत तुझ्याही आभाळ,माघार घेऊ नको

उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या,पाऊल रोखू नको 

साद घाली दिस उद्याचा नव्याने,इसर गजाल कालची रे



देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे


(सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ

शोधूनि तुझी तू वाट,चाल एकला

होऊ दे जरा उशीर,सोडतोस काय धीर

रात संपता पहाट,होई रे पुन्हा)


देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे.. माझ्या देवाक काळजी रे

====================

Video : 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, October 20, 2021

Jeev Dangla Gungla ..

 जीव दंगला गुंगला .. 


चित्रपट - जोगवा (२०१३)

गीतकार- संजय कृष्णाजी पाटील

संगीत - अजय-अतुल

गायक - हरिहरन, श्रेया घोशाल



====================


जीव दंगला, गुंगला, रंगला असा.. पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा.. गहिवरला श्वास तू


पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू


सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू


जीव दंगला, गुंगला, रंगला असा.. पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा.. गहिवरला श्वास तू






चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढीचा इटाळ
माझ्या लाख सजणा, ही कांकणाची तोड माळ तू


खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण


जीव दंगला, गुंगला, रंगला असा.. पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा.. गहिवरला श्वास तू




पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू

सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू



जीव दंगला, गुंगला, रंगला असा.. पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा.. गहिवरला श्वास तू


श्वास तू…

====================

Video :



~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Thursday, October 14, 2021

Rakhumai Rakhumai ..

रखुमाई रखुमाई .. 

चित्रपट -  पोष्टर गर्ल (२०१६)

गीतकार - वैभव जोशी

संगीत - अमितराज

गायक - मृण्मयी शिरीष दडके, प्रगती मुकुंद जोशी, रसिका गनू, कस्तुरी वावरे, पल्लवी तेलगांवकर

====================

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलंना
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलंना
ये ग.. ये ग..रखुमाई
ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी
ये ग.. ये ग.. रखुमाई
ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी


तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलंना


तू सकलांची आई, साताजन्माची पुण्याई
घेई पदरात आम्हावरी, छाया धर बाई
तुझी थोरवी महान, तिन्हीलोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई

तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास
तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी बाई
तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर होऊ दे ग उतराई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई


====================
Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, October 9, 2021

Hrudayi Vasant Fultana..

हृदयी वसंत फुलताना.. 


चित्रपट - अशी हि बनवा बनवी (१९८८)


गीतकार - शांताराम नांदगावकर


संगीत- अरुण पौडवाल


गायक- अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अपर्णा मयेकर

====================

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे


मोहुनिया, ऐसी जाऊ नको
रोखुनिया, मजला पाहू नको
मोहुनिया, ऐसी जाऊ नको
रोखुनिया, मजला पाहू नको


गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे


पाकळी पाकळी उमले, प्रीत भरलेली
हाय .. हाय
अवघी अवनी सजली धुंद मोहरली
पाकळी पाकळी उमले, प्रीत भरलेली
हाय .. हाय
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..

उसळून यौवनाचे या, नयनात रंग यावे
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे, हो अंतरी भुलावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे


मदभरा प्रीतीचा गंध हा,  दे गं मधुवंती
हाय .. हाय
रंग तू सोड रे छंद हा, तू नं मजसाठी
मदभरा प्रीतीचा गंध हा,  दे गं मधुवंती
हाय .. हाय 
रंग तू सोड रे छंद हा, तू नं मजसाठी...

हा खेळ ऐन ज्वानीचा, लाखात देखणासा
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमा मदन बाणांच्या, मन दरवळून जावे ..


हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

====================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, October 7, 2021

Dehachi Tijori..

देहाची तिजोरी .. 


चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा (१९६८)

गीतकार - जगदीश खेबुडकर

संगीत - सुधीर फडके

गायक - सुधीर फडके


====================

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता, उघड दार देवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा



पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची

मनी चोरट्याच्या का रे, भिती चांदण्यांची

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा




उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप

दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा


उघड दार देवा आता, उघड दार देवा




स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी

आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी

घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा



तुझ्या हाती पांडुरंगा, तिजोरी फुटावी

मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी

मार्ग तुझ्या राऊळाचा, मला आकळावा


उघड दार देवा आता, उघड दार देवा



भलेपणासाठी कोणी, बुरेपणा केला

बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला

आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा


उघड दार देवा आता, उघड दार देवा


देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता, उघड दार देवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

====================

Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, October 6, 2021

Priticha Zul Zul Paani song lyrics

प्रितीचं झुळ झुळ पाणी.. 


चित्रपट - बन्या बापू (१९७७)


गीतकार - मुरलीधर गोडे


संगीत - ऋषी-राज


गायक - उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग

====================

प्रितीचं झुळ झुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळ झुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळ झुळ पाणी


हा जीव वेडा, होई थोडा थोडा
वेड्या मनाचा, बेफाम घोडा
दौडत आला, सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगू दे विडा

साजणा, मी तुझी कामिनी

प्रीतीचं झुळ झुळ पाणी


मी धुंद झाले, मनमोर डोले
पिसाऱ्यातुनी हे, खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्न फुलोरा, मनांत झुले

मी तुझा हंस ग मानिनी

प्रीतीचं झुळ झुळ पाणी


ही तान नाचे, आसावरीची
मांडी नव्हे ही, उशी सावरीची
सोबत लाभे, मला ही परीची
किती स्वाद घेऊ, सरे ना रुची

साजणा वेळ का मिलनी

प्रीतीचं झुळ झुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी

रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळ झुळ पाणी


ला ला ला ला ल ला ला ... ला ला ला ल ला ला 

====================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Vara Gai Gaane

वारा गाई गाणे.. 

चित्रपट - संसार (१९८०)

गीतकार - शांता शेळके

संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

गायिका - लता मंगेशकर

====================
वारा गाई गाणे, प्रीतिचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फूल-पाने
वारा गाई गाणे, प्रीतिचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फूल-पाने
वारा गाई गाणे..

रंग हे नवे, गंध हे नवे
रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्‍न लोचनी वाटते हवे
रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्‍न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरूप लेणे
वारा गाई गाणे, प्रीतिचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फूल-पाने
वारा गाई गाणे..

या निळ्या नभी, मेघ सावळे
या निळ्या नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले.. पंख लावले
झेलते पिसांवरी हे सतेज सोने
वारा गाई गाणे, प्रीतिचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फूल-पाने
वारा गाई गाणे..


आज वेड हे, कुणी लाविले
आज वेड हे, कुणी लाविले
अंतराळी का पडती पाऊले
आज वेड हे, कुणी लाविले
अंतराळी का पडती पाऊले
कशी सोडवू मी, सुखाचे उखाणे
वारा गाई गाणे, प्रीतिचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फूल-पाने
वारा गाई गाणे..

====================
Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sunday, October 3, 2021

Ashtavinayaka Tujha Mahima Kasa

 अष्टविनायका तुझा महिमा कसा.. 


चित्रपट - अष्टविनायक (१९७९)


गीतकार - जगदीश खेबुडकर


संगीत - अनिल-अरुण


गायक - अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश


====================

अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती, पहिला गणपती..अहा
(गणपती, पहिला गणपती) अहा
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
(अकरा पायरी हो, हो अकरा पायरी हो)
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
(शोभा साजरी हो, शोभा साजरी हो)
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
अरे मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती, दुसरा गणपती आहा
(गणपती, दुसरा गणपती)
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
(थेऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लई लई जुनी)
काय सांगू आता काय सांगू
डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी
ओ साऱ्यांनी
ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी
ओ पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी
ओ वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी
भगताच्या मनी..
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती तिसरा गणपती
(गणपती तिसरा गणपती)
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
 रं रं रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
रं रं रं
(सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं.. पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं)
हे दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगरं
ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं, नवाल झालं
टेकावरी देऊळ आलं
(राकूस मेलं नवाल झालं, टेकावरी देऊळ आलं)
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
मंडपात आरतीला खुशाल बसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती गणपती गं चौथा गणपती
(गणपती गणपती गं चौथा गणपती)
बाई रांजणगावचा देव महागणपती
(बाई रांजणगावचा देव महागणपती)
दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती
(दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती)
गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन
(गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन)
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण
(सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण)
किती गुणगान गावं किती करावी गणती
(बाई रांजणगावचा देव महागणपती)
पुण्याईचं दान घ्यावं
हे पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती पाचवा, पाचवा गणपती
(गणपती पाचवा, पाचवा गणपती)
ओझरचा इघ्नेश्वर
बाई ओझरचा इघ्नेश्वर
लांब रुंद हाय मूर्ती
जडजवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
(ओझरचा इघ्नेश्वर)
डोळ्यामंदी माणकं हो.. डोळ्यामंदी माणकं हो
हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरती हो
सारा बघून सोहळा
चारीबाजू तटबंदी
मधी गणाचं मंदिर
(ओझरचा इघ्नेश्वर)
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय भक्तिभाव
रमती इथं रंकासंगती राव हे जी जी 
(रमती इथं रंकासंगती राव हे जी जी )
(रमती इथं रंकासंगती राव हे जी जी )
खडकांत केलं खोदकाम
खडकांत केलं खोदकाम 
दगडांत मंडपी खांब
दगडांत मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं
दगडांत भव्य मुखवटं
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
(ध्यास पार्वतीचा..ध्यास पार्वतीचा)
अन् गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
जी जी रं ... जी जी रं
दगड माती रूप देवाचं 
अरं दगड माती रूप देवाचं ,लेण्याद्री जसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


सातवा गणपती राया
सातवा गणपती राया
सातवा गणपती राया
हे हे हे हे हा

महड गावाची महसूर
वरद विनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद, जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची, कळसाच्या वरं
(कळसाच्या वरं)
सपनात भक्ताला कळं
देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं
त्यानं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती
हो हो हो हो हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
जी जी रं जी जी
(माझ्या गणा रं जी जी जी..माझ्या गणा रं जी जी जी..माझ्या गणा रं जी जी जी)
हे हे हे हे हं...

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)


(आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा )
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदिदेव तू बुद्धिसागरा
(पाली गावच्या बल्लाळेश्वरा,आदिदेव तू बुद्धिसागरा)
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख
सूर्यनारायण करी कौतुक
(स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख, सूर्यनारायण करी कौतुक)
डाव्या सोंडेचे रूप साजिरे
कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे
(डाव्या सोंडेचे रूप साजिरे, कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे)
चिरेबंद या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भीती
(चिरेबंद या भक्कम भिंती, देवाच्या भक्तीला कशाची भीती)

ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..अष्टविनायका तुझा महिमा कसा..)

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)
(अष्टविनायका तुझा महिमा कसा..)

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
===================
Video :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Datun Kanth Yeto

 दाटून कंठ येतो .. 


चित्रपट - अष्टविनायक (१९७९)

गीतकार - शांता शेळके

संगीत - अनिल-अरुण

गायक- पं. वसंतराव देशपांडे

====================

दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्री गणेशा
वळवून अक्षरांना, केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी, जातो सुखावुनि मी
या गोड आठवाने
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


बोलात बोबडीच्या संगीत जागविले
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, एकेक सूर यावा
न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे
व्हावे सुरेलगाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो..


घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, परक्या परी आता मी
येथे फिरुनी येणे
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
दाटून.. कंठ येतो

===================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, October 2, 2021

Nishana Tula Dislana

निशाणा तुला दिसलाना.. 


चित्रपट - नवरी मिळे नवऱ्याला (१९८४)

गीतकार - शांताराम नांदगावकर

संगीत - अनिल-अरुण

गायक - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर


====================

निशाणा.. तुला दिसला ना
निशाणा.. तुला दिसला ना
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
भिरभिर करी मदनाचा वारा
ये ना सजणा ये ना
निशाणा.. तुला दिसला ना
निशाणा.. तुला दिसला ना
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
भिरभिर करी मदनाचा वारा
ये ना सजणा ये ना..
निशाणा.. तुला दिसला ना
निशाणा.. तुला दिसला ना


भिजली पाने वेली, आसमंत हा
अंगी फुलूनी आला रे, वसंत हा
भिजली पाने वेली, आसमंत हा
अंगी फुलूनी आला रे, वसंत हा
प्रीतजळी भिजूनी तू ये ना
अलगद मज हृदयासी घे ना
ये ना सजणा ये ना..
निशाणा.. तुला दिसला ना
निशाणा.. तुला दिसला ना


हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
नेम असा तू धरुनी तू ये ना
सावज हे तू वेधून घे ना
ये ना सजणा ये ना..
निशाणा.. तुला दिसला ना
निशाणा.. तुला दिसला ना


सावज होई शिकारी जादू पाहूनी
घायाळांची प्रीती आली रंगूनी
सावज होई शिकारी जादू पाहूनी
घायाळांची प्रीती आली रंगूनी
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुला तू जवळी ये ना

ये ना सजणी ये ना
निशाणा.. मला जमला ना
निशाणा.. मला जमला ना
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिरभिर करी मदनाचा वारा

ये ना सजणी ये ना
निशाणा.. मला जमला ना
निशाणा.. तुला दिसला ना
ओ ओ 
निशाणा.. मला जमला ना
निशाणा.. ल ल ला
निशाणा.......

====================

Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Kunachya Khandyawar Kunache Ojhe

 कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. 


चित्रपट - सामना (१९७४)


गीतकार - आरती प्रभू


संगीत - भास्कर चंदावरकर


गायक - रविंद्र साठे

                      ====================

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझें, कुणाचे ओझें
कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें


कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कोणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें


दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें
कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें


कुणाचें ओझें?
कुणाचें ओझें?
कुणाचें...

====================

Video :



~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Disla Ga Bai Disla

 दिसला गं बाई दिसला.. 


चित्रपट - पिंजरा (१९७२)


गीतकार - जगदीश खेबुडकर


संगीत - राम कदम


गायिका - उषा मंगेशकर


====================

ज्वानीच्या आगीची मशाल हाती, 
आले मी अवसंच्या भयाण राती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती
दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग ओ ओ ओ ओ 
दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसं ना मला
कुठं दिसं ना, इथं दिसं ना, तिथं दिसं ना, इथं दिसं ना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं

दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म 
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म



गडी अंगानं उभा नि आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा गं त्याच्या रूपात गावरान गोडवा
गडी अंगानं उभा नि आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामंदी ठसला, गं बाई बाई काळजामंदी ठसला
काळजामंदी .. काळजामंदी .. काळजामंदी
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म


माझ्या राजाचा न्यारा डौलं
डाव्या डोळ्याचा देतोय कौल 
हो हो 
माझ्या राजाचा न्यारा डौलं
डाव्या डोळ्याचा देतोय कौल 
लहरी पटका, मानेला झटका
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला, गं बाई बाई भाला उरी घुसला
भाला उरी .. भाला उरी ..
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म


अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा गं बाई आग आगीवर झाली फिदा
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा 
उडल भडका, चढंल धुंदी
उडल भडका, चढंल धुंदी
जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसला
जीव जीवा..जीव जीवा.. जीव जीवा
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म
मला बघून गालात हसला गं बाई हसला
हम्म हम्म

====================

Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~