Sunday, July 19, 2015

Mauli Mauli ....

माऊली माऊली ....


चित्रपट : लई भारी (२०१४)

गीतकार : गुरु ठाकुर 

संगीत : अजय-अतुल

गायक : अजय गोगावाले


====================


विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली, तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल



भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नांदावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली 
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे 

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल



चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा 
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा

आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा 
पाहण्या गा तुझ्या लोचनांत, भाबड्या लेकरांचा लळा 

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली 
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा,परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल


चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी


मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 



====================
Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Friday, July 10, 2015

Swapna Chaalun Aaley

स्वप्न चालून आले ....


चित्रपट : क्लासमेट्स (२०१५)

गीतकार : क्षितीज पटवर्धन


संगित : पंकज पडघन


गायक : सोनू निगम, सायली पंकज 



====================

स्वप्न चालून आले, बघता बघता
हम्म्म्म
स्वप्न चालून आले, बघता बघता
माझे होऊन गेले, हसता हसता
रंग रंगीत झाले, दिसता दिसता
श्वास संगीत झाले, जूळता जूळता

चांदण्यात भिजतो, दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो, का मला ?

हं हं हं

तूच आज ही , तू उद्या
तूच सावली, ह्या दिशा


वाट होते, पैजणांची
सोबती ने, तुझ्या ....

स्वप्न चालून आले, बघता बघता ....



तूच ही उन्हें कोवळी
तूच साँझ ही सावळी

रात होते मोहरनारी
सोबतीने तुझ्या

स्वप्न चालून आले, बघता बघता
हो ओ ओ ओ
स्वप्न चालून आले बघता बघता

माझे होऊन गेले हसता हसता
रंग रंगीत झाले दिसता दिसता
श्वास संगीत झाले जूळता जूळता

चांदण्यात भिजतो दिवसा..  आता
मी तुझ्यात दिसतो का मला


====================

Video :


#AnkushChaudhari #SonaleeKulkarni #Classmates #SonuNigam #SwapnaChalunAale

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sunday, June 28, 2015

Haa Saagari Kinaraa ...

हा सागरी किनारा ....


चित्रपट     : मुंबईचा फौजदार (१९८५)

गीतकार    : जगदीश खेबुडकर

संगीतकार : विश्वनाथ मोरे

गायक       : सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल

====================


हा सागरी किनारा,
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा 
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा,
अंगवारी शहारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा..



मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी, का न्यारीच आज गोडी
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी, का न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी
ओ ओ ओ 
का भूल ही पडावी
वळखून घे इशारा 
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगवारी शहारा 

ओ ओ ओ 
हा सागरी किनारा

होते अजाणता मी ते छेडले तराणे 
होते अजाणता मी ते छेडले तराणे
स्वीकारल्या सुरांचे, आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई... हा रोम रोम गाई 
गातो निसर्ग सारा,ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा

ओ ओ ओ 

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा


====================

Video :





#SureshWadkar #AnuradhaPaudwal #MumbaichaFauzdar 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Drushta Lagnya Joge Saare ....

दृष्ट लागण्याजोगे सारे ....

चित्रपट  : माझं घर माझा संसार (१९८६)

गीतकार : सुधीर मोघे 

संगित    : अरुण पौडवाल 

गायक    : सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल 


====================
हम्म हम्म हम्म्म
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

हम्म्म हम्म्म हम्म्म
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे




स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे

दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे

स्वप्नाहून सुंदर घरटे,
ला ला ला ला

मनाहून असेल मोठे

ला ला ला ला
दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे




आनंदाची अन्‌ तृप्तीची,
शांत सावली इथे मिळे

जग दोघांचे असे रचू की,

स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..



जुळलेले नाते अतुट,घड़े जन्म जन्माची भेट
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण

जुळलेले नाते अतुट,
ला ला ला

घड़े जन्मजन्माची भेट
ला ला ला ला
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण

सहवासाचा सुगंध येथे
आणि सुगंधा रूप दिसे

जग दोघांचे असे रचू की

स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे


दृष्ट लागण्याजोगे सारे,
गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे …


====================



Video :






#SureshWadkar #AnuradhaPaudwal #AjinkyaDev


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Chimb Bhijlele ...

चिंब भिजलेले ....

चित्रपट : बंध प्रेमाचे  (२००७)

गीतकार : प्रवीण दवणे 

गायक : शंकर महादेवन, प्रीति कामत

संगित : अजय-अतुल




====================

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती

हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...



ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले
सप्‍तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले

लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...



हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्‍नांचे

बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल छंदांचे

घन व्याकूळ रिमझिमणारा, मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...

====================

Video :

#AjayAtul #ShankarMahadevan #BandhPremache #ChimbBhijlele

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Abhas Ha ....

आभास हा ....


चित्रपट : यंदा कर्तव्य आहे (२००६)

गीतकार : आश्विनी शेंडे

संगित  : नीलेश मोहरीर 


गायक : राहुल वैद्य , वैशाली सामंत 





====================


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला 
आभास हा... आभास हा



क्षणात सारे उधाण वारे, झुळूक होऊन जाती
कधी दूर तूही, कधी जवळ वाटे,
पण काहीच नाही हाती

मी अशीच हासते, उगीच लाजते,
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते,तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 



मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे

तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा

कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 

====================

Video :



#AnkushChaudhari #AbhasHaa #SonuNigam #YandaKartavyaAahe

~~~~~~~~~~~~~~~~~~~


Man Udhan Varyache ....

मन उधान वा-याचे ....


चित्रपट   : अगं बाई..अरेच्या (२००४)

गायक    : शंकर महादेवन

गीतकार : गुरु ठाकुर 


संगीत    : अजय-अतुल




====================

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.....
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.....
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते (२)


आकाशी स्वप्‍नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते...

मन उधाण वार्‍याचे,
गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

====================
Video :





#AjayAtul #ShankarMahadevan #SanjayNarvekar #ManUdhanVaryache 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~