Sunday, June 28, 2015

Chimb Bhijlele ...

चिंब भिजलेले ....

चित्रपट : बंध प्रेमाचे  (२००७)

गीतकार : प्रवीण दवणे 

गायक : शंकर महादेवन, प्रीति कामत

संगित : अजय-अतुल




====================

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती

हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...



ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले
सप्‍तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले

लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...



हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्‍नांचे

बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल छंदांचे

घन व्याकूळ रिमझिमणारा, मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे...

====================

Video :

#AjayAtul #ShankarMahadevan #BandhPremache #ChimbBhijlele

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment