Tuesday, January 13, 2026

Gala warchi Khali Tujhya

    गाला वरची खळी तुझ्या ..



चित्रपट  - राम राम गंगाराम  (१९७७)

गीतकार - राजेश मजुमदार 

संगीत  - राम लक्ष्मण 

गायिका - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर 


====================


गाला वरची खळी तुझ्या 
लावी येड मला 
हं, कसं सांगू तुला ..
एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 




हं , जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला 
काय सांगू तुला ..
एक झोका दे, झोका दे, झोका दे 
 एक झोका दे, झोका दे, झोका दे  



भर ज्वानीचं पखवाज 
कसं देतूया आवाज 
हे तुझ्या गोल-गोल अंगाच्चा 
काही लागंना अंदाजा 


असं नावं नका ठेवू 
गुण माझे नका गाऊ 
मला होत्तील गुदगुल्या , बोट नका कुठ लावू
तहानलेल्या दोन जीवांची तहान भागू दे 

एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 



हं , जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला 
काय सांगू तुला ..
एक झोका दे, झोका दे, झोका दे 
 एक झोका दे, झोका दे, झोका दे  



हे आपल्या नाजूक हातानं, तुला घडवलं देवानं 
माझ्या पदरात टाकलंय्या, दान किती हे प्रेमाने 

तुला लाखात निवडीनं , सारं करील आवडीनं 
नको येऊसं घाईल्ला, हळू-हळू घे सवडीनं
तुझा नी माझा जगात साऱ्या डंका वाजू दे 

एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 



हं , जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला 
काय सांगू तुला ..
एक झोका दे, झोका दे, झोका दे 
 एक झोका दे, झोका दे, झोका दे  





हे तुझ्या नजरेची धार , हे लावी जीवाला हूर-हूर 
तूला पाहून उठतया , हा माझ्या मनात काहूर

लय नाजूक ही काया, तुमासाठीच ठिवलीया
कशी उघडून दाखवू मी, माझ्या मनातली माया 
जन्मो जन्मी तुझ्या सारखा मैतर लाभू दे
 

एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 

अगं गाला वरची खळी तुझ्या 
लावी येड मला 
हं, कसं सांगू तुला ..
एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 


हं , जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला 
काय सांगू तुला ..
एक झोका दे, झोका दे, झोका दे 
 एक झोका दे, झोका दे, झोका दे  

एक मौका दे, मौका दे, मौका दे 
एक मौका दे, मौका दे, मौका दे 



====================

Video : 




~~~~~~~~~~~~~~~~~~~~