ही चाल तुरुतुरु ..
संगीत - देवदत्त साबळे
गायक - जयवंत कुळकर्णी
====================
ही चाल तुरुतुरू उडती केस भुरूभुरू
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
ही चाल तुरुतुरू उडती केस भुरूभुरू
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
इथ कुणी आसपास ना
डोळ्यांच्या कोनात हास ना
तु जरा माझ्याशी बोलना
ओठांची मोहोर खोल ना
तू लगबग जाता मागं वळून पाहता
वाट पावलात अडखळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
उगाच भुवई ताणून
उगाचा रुसवा आणून
पदर चाचपून हातानं
ओंठ जरा दाबीशी दातानं
हा राग जीवघेणा खोटाखोटाच बहाणा
आता माझी मला खुण कळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
ही चाल तुरुतुरू उडती केस भुरूभुरू
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
====================
Video :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~