झाल्या तिन्ही सांजा ..
संगीत - राम लक्ष्मण
गायिका - उषा मंगेशकर
====================
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
भेटीत रायाच्या ,सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेल्या हरिणीला ,हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
त्यांच्याच ओठांचा ,ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी, रंगून जावा राजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
वाटतं सख्याचं ,वाजलं पाउल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद ,होईल गाजावाजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
इचारच पडला बिचाऱ्या मनाला
वेळ का गं व्हावा बाई, सख्या साजनाला
बिलगून बसावी ,शंभूला सारजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं येणार साजन माझा
====================
Video :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~